Pimpri News: महापालिका सहायक आयुक्तपदी नीलेश देशमुख रूजू

आकाशचिन्ह व परवाना विभागाचा पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त पदावर मुख्याधिकारी गट ‘अ’ संवर्गातील नीलेश देशमुख हे आज (गुरूवार) पासून रूजू झाले. देशमुख यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.

राज्याच्या नगरविकास विभागाने पुणे महापालिकेत कार्यरत असणारे नीलेश देशमुख यांना 29 डिसेंबर 2020 रोजी पिंपरी – चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्त पदावर बढती दिली. 4 जानेवारी रोजी देशमुख यांना पुणे महापालिकेने कार्यमुक्त केले.

त्यानुसार नीलेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. 5) पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सहायक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. देशमुख यांच्याकडे महापालिकेतील आकाशचिन्ह व परवाना विभागाचे कामकाज सोपविण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.