Pimpri News: निरंकारी संत समागम डिसेंबरमध्ये व्हर्च्युअल रूपात

एमपीसी न्यूज – निरंकारी मिशनचा यंदाचा 73 वा निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात 5, 6 आणि 7 डिसेंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. वैश्विक महामारी कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारत सरकारने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन हा संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित करण्यात येत आहे.

जगभरातील लक्षावधी भाविक-भक्तगण घरबसल्या ऑनलाईनच्या माध्यमातून हा समागम पाहू शकणार आहेत.  निरंकारी मिशनच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे, की वार्षिक निरंकारी संत समागम व्हर्च्युअल रूपात आयोजित केला जात आहे. ही शुभ सूचना मिळाल्याने समस्त निरंकारी जगतामध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हर्च्युअल रुपातील या संपूर्ण समागमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण संत निरंकारी मिशनच्या वेबसाईटवर दिनांक 5,6, 7 डिसेंबर 2020 रोजी केले जाणार आहे. या व्यतिरिक्त हा समागम संस्कार टीव्ही चॅनलवर तिन्ही दिवशी सायंकाळी 5.30 ते रात्री 9 या वेळात प्रसारित करण्यात येईल.

या वर्षी निरंकारी समागमाचा मुख्य विषय ‘स्थिरता’ आहे. संत निरंकारी मिशन आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगभरात सत्य, प्रेम, एकत्वाचा संदेश देत आहे. एका बाजुला प्रभु परमात्मा स्थिर आहे, अचल आहे. तर, दुसऱ्या बाजुला विश्वातील इतर सर्व गोष्टी गतिमान, अस्थिर व परिवर्तनशील आहेत. त्यामुळे स्थिर परमात्म्याशी नाते जोडूनच स्थिरता प्राप्त केली जाऊ शकते. वर्तमान काळातील आधुनिक परिवेशामध्ये हे जगत गतिमान होण्याबरोबरच कुठे ना कुठे अस्थिरही होत चालले आहे. अशा परिस्थितीत मानवी मनाला आध्यात्मिक रुपात स्थिर होण्याची नितांत गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.