Pimpri News: निर्माल्यात यंदा तब्बल 26 टनाने झाली घट

संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने जमा झालेले निर्माल्य महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पासाठी देण्यात आले. 

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा पिंपरी- चिंचवड शहरातील गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. दरवर्षी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मूर्तीदान व निर्माल्य दान राबविले जाते. मागीलवर्षी 33 टन निर्माल्य दान प्रतिष्ठानकडे आले होते. तर यंदा फक्त 7 टन निर्माल्य दान झाले आहे. यंदा तब्बल 26 टनाने निर्माल्यात घट झाली आहे.

शहरामध्ये कोरोना संक्रमण असल्याने प्रशासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. तसेच विसर्जनासाठी घाटही बंद ठेवण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.

यावर्षी अनेक नागरिकांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली नाही. त्यामुळे मूर्तीदान व निर्माल्यदान मागीलवर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी झाले. मागीलवर्षी 52 हजार 577 मूर्तींचे दान प्रतिष्ठानकडे आले होते. तसेच 33 टन निर्माल्य जमा झाले होते. यंदा 31 हजार 754 मूर्तींचे दान मिळाले तर 7 टन निर्माल्य दान आले.

म्हणजेच यावर्षी तब्बल 26 टन कमी निर्माल्य दान प्रतिष्ठानकडे आले आहे. तसेच मूर्तींचेही दान कमी झाले. संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने जमा झालेले निर्माल्य महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पासाठी देण्यात आले.

कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे यंदा नागरिकांनी गणपतीची स्थापना केली नाही. त्यामुळेच मूर्ती संकलन व निर्माल्य दान कमी आले असल्याचे संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक मोहन गायकवाड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.