Pimpri: दत्ता साने यांच्या निधनाची बातमी दुःखद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Pimpri: News of Datta Sane's demise is sad says Health Minister Rajesh Tope आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक दत्ता साने यांचे शनिवारी (दि.4) कोरोना विषाणूमुळे निधन झाले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दत्ता साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असं टोपे यांनी ट्विट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले. शनिवारी (दि.4) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.