Pimpri News: अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका कार्यक्षेत्र सोडता येणार नाही; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय, कोविड अंतर्गत कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या मान्यतेशिवाय महापालिका कार्यक्षेत्र सोडता येणार नाही. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांना काढला आहे.

शहरातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिका स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता महापालिका स्तरावर अहोरात्र प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी महापालिका कार्यालयात, क्षेत्रीय स्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे आवश्यक आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये, ज्या अधिकाऱ्यांच्या कोविड कामकाजाकरीता नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. कोविड नियंत्रण, त्यासंदर्भातील कक्षाचे कामकाज सार्वजनिक, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. नोडल, समन्वय, नियंत्रण अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य राहील.

कोविड संबंधी कामकाजाची आवश्यकता असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत दुरध्वनीमार्फत सूचना द्याव्यात. महापालिका कार्यालयाचे तातडीचे व महत्वाचे काम चालू राहण्याच्या दृष्टीने संबंधित विभागप्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शासन आदेशानुसार आळीपाळीने कार्यालयात बोलवावे.

सर्व विभागप्रमुखांनी त्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा संपर्क पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी कार्यालयास उपलब्ध करुन द्यावेत. याबाबतच्या नोंदी ठेवाव्यात. तसेच कार्यालयास ज्यावेळेस अशा कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. त्यावेळेस संपर्क साधल्यानंतर ते उपलब्ध होतील. याची दक्षता घ्यावी. तसेच कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहणे अनिवार्य राहील.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेकरिता प्रशासन, वैद्यकीय, आरोग्य विभाग आणि इतर विभागप्रमुखांमार्फत ज्या अधिकारी, कर्मचा-यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या, महापालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवा देत असलेले विभाग, आपत्कालीन विभाग, कार्यालयाबाहेर भेटी देणे आवश्यक असते. अशा कार्यालयांनी उपलब्ध अधिकारी, कर्मचारी यांचे कामकाजाचे काटेकोरपणे नियोजन करावे. ऱ्यां

प्रशासन विभागाशी समन्वय साधून मनुष्यबळ उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी. विभागप्रमुखांनी मनुष्यबळ, इतर कामकाजाकरिता प्रशासन विभागाशी समन्वय साधण्यासाठी एक समन्वय अधिकारी नेमावा. त्याचे नाव संपर्क क्रमांकासह प्रशासन विभागास उपलब्ध करुन द्यावे. कार्यालयातील कर्मचाऱ्याला वैद्यकीय कारणांखेरीज इतर प्रकारच्या रजा देय राहणार नाही याची विभागप्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.