-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : अधिकारी, कर्मचाऱ्यांनो कुटुंबातील सदस्याच्या व्यवसायाची माहिती द्या, अन्यथा…

महापालिका आयुक्तांचा इशारा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महापालिकेचा कोणताही अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसाय करत असेल तर त्याची माहिती महापालिकेस कळवावी. शासकीय, पालिकेच्या राखीव जमिनी, मिळकतींवर अतिक्रमण करुन व्यावसाय उभारला असल्यास ते ताबडतोब स्वत:हून स्व:खर्चाने काढून घेवून महापालिकेला तत्काळ अवगत करावे. त्यानंतर असे बांधकाम, व्यवसाय झाल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांना कामकाजाच्या दृष्टीने विविध स्वरुपाचे आर्थिक, प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज सोपविण्यात आले आहे. दैनंदिन कामकाज करताना अधिका-यांचा नागरिक, ठेकेदार यांच्याशी संपर्क येत असतो. ही कामे करण्यासाठी अधिकारी, कर्मचा-यांना विविध प्रलोभने, आर्थिक आमिषे दाखविली जातात.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

किंवा विविध स्वरुपाची कार्यालयीन कामे करण्यासाठी वेळप्रसंगी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून देखील पैशांची मागणी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी ठरते.

महापालिकेच्या काही अधिकारी, कर्मचा-यांकडून महापालिका हद्दीत विविध स्वरुपाचे अनधिकृत, बिगरपरवाना बांधकामे केलेली असू शकतात. महापालिकेच्या, शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करुन व्यवसाय केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने अधिकारी, कर्मचा-यांकडून बेकायदेशीर काम होऊ शकते. त्यामुळे पालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन होऊ शकते.

शासकीय कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती एखाद्या व्यापारात अथवा धंद्यात गुंतलेली असेल किंवा व्यवस्था पाहत असेल. व्यवसाय महापालिका कामकाजाशी निगडीत असल्यास ही बाब महापालिकेस वेळीच कळविणे आवश्यक आहे. जेणेकरुन महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्याने महापालिका कामकाजात सहभाग दिसून येणार नाही याची दक्षता सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी घेणे आवश्यक आहे. जेणेकरुन वर्तणूक नियमाचा भंग होणार नाही, असे आयुक्तांनी परिपत्रकात म्हटले आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.