Pimpri News : कचरा वाहतूक व्यवस्थेची अधिका-यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) कचरा वाहतूक व्यवस्थेची आज (गुरुवारी) सकाळी अधिका-यांनी पाहणी केली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ह प्रभाग कार्यक्षेत्रातील भागाची अधिका-यांसमवेत पाहणी केली.
कचरा हस्तांतरण केंद्र, कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या, कचरा विलगीकरण व्यवस्थापन तसेच त्यासाठी ओला कचरा प्रक्रिया करणाऱ्या काही गृह निर्माण संस्थांना देखील (Pimpri News) अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी भेटी दिल्या.
यावेळी आरोग्य विभाग प्रमुख रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते. आरोग्य विभागामार्फत शहरात पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागप्रमुख रविकिरण घोडके यांनी दिली.