Pimpri News: जुने जिजामाता रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे जुने जिजामाता रूग्णालय, कमला नेहरू शाळा, पिंपरी येथून, नविन जिजामाता रुग्णालयात (जयहिंद शाळे समोर, पिंपरी) येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

या नवीन जिजामाता रुग्णालयाचे उदघाटन नगरसेवक डब्बु आसवानी, संदीप वाघेरे, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे , जिजामाता रूग्णालयाच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणि, डॉ. शैलजा भावसार, डॉ बाळासाहेब होडगर, डॉ वीणा गंभीर यांच्या हस्ते करण्यात आले.

आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशानुसार, जुने जिजामाता रुग्णालय नवनिर्मित इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. ओपीडी विभाग, प्रयोगशाळा आजपासून आणि आयपीडी विभाग 24 जुलैपासून सुरू करण्यात आला आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.