Pimpri News : पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्यावतीने श्रीरंग बारणे यांना देण्यात आले गुणवंत कामगारांच्या मागणीचे पत्र

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा गुणवंत कामगार (Pimpri News) विकास समितीच्या वतीने गुणवंत कामगारांच्या मागणीचे पत्र  मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना  देण्यात आले. हे पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही देण्यात आले आहे.

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, प्रमुख सल्लागार शिवाजीराव शिर्के, सरचिटणीस सुरेश कंक, सुभाष चव्हाण, मनोहर दिवाण, वसंत कोल्हे, सोमनाथ कोरे व पंकज पाटील उपस्थित होते.

 

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे झाडावर बसून आंदोलन;नदी पात्रातील झाडांची कत्तल होऊ नये म्हणून उचलले पाऊल

 

 

गुणवंत कामगारांना दिलेले विशेष कार्यकारी अधिकारी पद  विशिष्ट कालावधीने न बदलता हयातभर ठेवावे,
 महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कामगारांना त्वरित 10,000 रुपये पेन्शन चालू करावी; महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, गावो गावच्या ग्रामपंचायती इथे गुणवंत कामगारांना पाच वर्ष काम करण्याची प्राधान्याने संधी मिळावी ; एस टी, बस, रेल्वे येथील प्रवासात 100 टक्के सवलत जाहीर करावी, गुणवंत कामगारांना विमा संरक्षण मिळावे या मागण्या या पत्रातून पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीने केल्या आहेत.

 

याबाबत बोलताना समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे म्हणाले , “स्वतःची पदर मोड करून आजही महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कामगार विविध क्षेत्रात सामाजिक सेवा मनोभावे करीत आहेत त्यांना दिलासा (Pimpri News) देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योग्य ती पाऊले उचलावीत.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.