Pimpri News: डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात दीड लाखांची चोरी

वेल्डिंग मशीन पार्ट, एक सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर, हार्डडिस्क, मॉनिटर असा एकूण एक लाख 50 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

एमपीसी न्यूज – लॉर्च वेल्डिंग प्रोडक्ट्स प्रा. लि.च्या सी/ओ डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. केंद्रातून वेल्डिंग मशीनचे पार्ट, सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर हार्डडिस्क आणि मॉनिटर असा एकूण एक लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 10 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला आहे.

गणेश अप्पा जाधव (वय 37, रा. गिरिम, ता. दौंड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोरनगर, चिंचवड येथे लॉर्च वेल्डिंग प्रोडक्ट्स प्रा. ली. यांचे सी/ओ डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात 7 ऑगस्ट सायंकाळी साडेसहा ते 10 ऑगस्ट सकाळी नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून प्रवेश केला.

वेल्डिंग मशीन पार्ट, एक सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर, हार्डडिस्क, मॉनिटर असा एकूण एक लाख 50 हजार रुपयांचा माल चोरून नेला. याबाबत गुरुवारी (दि.13) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.