Pimpri News : पालिकेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पात उडी मारून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पात उडी मारून एकाने आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 8) दुपारी लिंकरोड, पिंपरी येथे घडली.

रवी शाम जानराव (रा. लिंक रोड, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीने दुपारी लिंक रोड पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मैला शुद्धीकरण प्रकल्पात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.