Pimpri News: श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी एक किलो चांदीची वीट विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्द

Pimpri News: One kg silver brick handed over to Vishwa Hindu Parishad for Shriram Janmabhoomi temple पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक शशांक काळे यांनी श्रीराम मंदिरासाठी एक किलो चांदीची वीट विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सुपूर्द केली.

एमपीसी न्यूज – अयोध्यानगरीतील श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी उद्योजक शशांक काळे यांच्या वतीने एक किलो चांदीची वीट विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले. या भूमिपूजन सोहळ्यानिमित देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरा करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक शशांक काळे यांनी श्रीराम मंदिरासाठी एक किलो चांदीची वीट विश्व हिंदू परिषद यांच्याकडे सुपूर्द केली.

मुंबई क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, चिंचवड विभाग मंत्री नितीन वाटकर, भीमाशंकरचे जिल्हा मंत्री, दयानंद शिंदे, मुकेश पाठक, प्रवीण फाकटकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.