Pimpri News: फेरीवाला सर्वेक्षणास एक महिन्यांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri News) 30 नोव्हेंबरअखेर पर्यंत सुमारे 11 हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र सर्वेक्षण करताना येणाऱ्या विविध अडचणी आणि फेरीवाल्यांचा विचार करून या सर्वेक्षणास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर अखेरपर्यंत शहरातील सुमारे 11 हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. जास्तीत-जास्त फेरीवाल्यांचे सर्वेक्षण व्हावे, यासाठी पालिकेने 31 डिसेंबरपर्यंत सर्वेक्षणासाठी मुदतवाढ दिली आहे.

भूमी आणि जिंदगी विभागाचे (Pimpri News) सहायक आयुक्त प्रशांत जोशी म्हणाले, शहराच्या इंडेक्‍समध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून यामध्ये नागरिक आणि फेरीवाले यांची भूमिका महत्वाची आहे. त्यादृष्टीने 31 डिसेंबर 2022 पर्यंत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहरात 20 ते 22 हजार फेरीवाले असण्याची शक्‍यता आहे. फेरीवाल्यांनी महापालिकेला सहकार्य करावे. आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्र करून घ्यावा. फेरीवाला सर्वेक्षणासाठी संबधित फेरीवाल्यांकडे आधारकार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डचे पहिले पान व शेवटचे पान यांची एका पानावरील छायांकित असणे अनिवार्य आहे. जातप्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वतःजवळ ठेवावी, असे आवाहनही जोशी यांनी केले आहे.

PCMC News: अर्धे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर मानधनावर भरणार 285 शिक्षक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.