Pimpri News : चिखली येथील सदनिकांची महापौरांच्या हस्ते ऑनलाईन सोडत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील आर्थिकदृषट्या दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील सदनिकांची सोडत महापौर ढोरे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 23) ऑटोक्लस्टर चिंचवड येथे झाली.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप आदी उपस्थित होते.

महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणाल्या, “पिंपरी चिंचवड महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या घरकुलातील सदनिकेचा वापर योग्य पद्धतीने करावा, त्यांची विक्री करु नये अथवा भाड्याने देऊ नये. महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी विविध प्रकल्प उभारले आहेत. या घरकुल प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहरातील घराचे स्वप्न साकार झाले आहे. या निमित्ताने झालेला आनंद लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत आहे. स्वत:ला राहण्यासाठी या घरकुलाचा वापर लाभार्थ्यांनी करावा. परिसर स्वच्छ व सुंदर ठेऊन आपल्या स्वत:च्या घराचा आनंद लाभार्थ्यांनी घ्यावा असेही त्या म्हणाल्या.

यावेळी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसोयटी क्र 140 इमारत क्रमांक बी 9 चे अध्यक्ष विजय हरीभाऊ कदम व बी 10 चे अध्यक्ष अनिल दगडू सरवदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे केले. सूत्रसंचालन विष्णू भाट यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.