Pimpri News: धनगर समाजातील वधू-वर नोंदणीसाठी ऑनलाईन संकेतस्थळ

15 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – धनगर समाज सेवा संघ यांच्यातर्फे समाजातील वधू-वर नोंदणीसाठी www.dhangarsevapune.com हे ऑनलाईन संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. त्यावर 15 डिसेंबर 2020 पर्यंत समाजातील सर्व शाखेतील वधु-वरांनी नोंदणी करण्याचे आवाहन सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती संघाचे अध्यक्ष मुकुंद कूचेकर, सचिव विजय भोजने यांनी दिली. दरवर्षी धनगर समाजातील सर्व जाती पोटजातीतील वधू-वर परिचय मेळावा जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येतो. परंतु, यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमाचा विचार करता यासाठी आवश्यक असणारी परवानगी उशिरा मिळण्याची शक्यता आहे.

त्यासाठी उपाययोजना म्हणून वधू-वरांची प्रथम पसंती असलेल्या धनगर समाज सेवा संघातर्फे दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर www.dhangarsevapune.com ही वेबसाईट सुरु केली आहे. त्यावर 15 नोव्हेंबर पासून मोफत वधू-वर नोंदणी चालू करण्यात आली आहे. धनगर समाजातील सर्व शाखेतील वधू-वरांनी 15 डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी 9673836898  या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वधू-वर किंवा नातेवाईकांना नोंदणी करणे शक्य असून नोंदणी करणाऱ्यांनी वधू-वर यांच्याशी असलेले नाते नमूद करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना नाव /जन्म दिनांक/वेळ/पत्ता/ शिक्षण/नाते/ अपेक्षा नमूद करावे. धनगर समाजातील सर्व शाखेतील वधू / वर नोंदणी करता येते. शैक्षणिक /व्यापारी /अधिकारी शेतकरी सर्व स्तरावरील वधू वर नोंदणी करता येते.

कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी नियम व पोलीस परवानगी मिळाल्यानंतर मेळावा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सचिव भोजने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.