Pimpri News : मोबाईल एवढेच शरीरावर लक्ष दिले पाहिजे – डॉ. राजीव नगरकर

एमपीसी न्यूज – आयुष्याच्या वाटेवर चालत असताना (Pimpri News) प्रत्येकाने आपल्या मोबाईल एवढच आपल्या शरीरावर देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. माणूस हा व्याख्यांचा समुदाय आहे. व्याख्या दुरुस्त झाली कि माणूस दुरुस्त झाला असे समजावे. शरीरासाठी व्यायाम तर मेंदूसाठी ध्यानधारणा करणे देखील महत्वाचे आहे. वेळात वेळ काढून प्रत्येकाने रोज व्यायाम, ध्यान केलं पाहिजे असे आवाहन डॉ. राजीव नगरकर यांनी केले.

जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण जनजागृतीपर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, शहर क्षयरोग दुरीकरण अधिकारी डॉ.बाळासाहेब होडगर, डॉ. अंजली ढोणे, शहर क्षयरोग दुरीकरण केंद्र तसेच स्टाफ नर्स, ए एन एम, आशा वर्कर, एन टी इ पी क्षयरोग अधिकारी व कर्मचारी, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, विविध सामायिक संस्था, एनजीओ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, निक्षय मित्र यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉ. पवन साळवे यांनी केले. क्षय रोग निर्मूलनाचे एकत्रितपणे काम करा असे आवाहन त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना केले. 2025 पर्यंत क्षयरोग संपन्न करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. यामध्ये नागरिकांनी देखील सहभाग घेतला पाहिजे. क्षय रोगाबद्दल जनजागृती करताना खासगी डॉक्टरांनी देखील योगदान दिलं पाहिजे असे डॉ.किशोर खिलारे म्हणाले.

Metro News : मुठा नदीला पार करत मेट्रो धावली रुबी हॉल स्थानकापर्यंत

क्षय रोग संदर्भात अनेक समज गैरसमज रुग्णाप्रती चुकीची भावना या सर्वांमुळे (Pimpri News)  रुग्णाचे मानसिक खच्चीकरण व जगण्याची उमेद संपून जाते. यासाठी जनजागृती करणा-या खाजगी रुग्णालय ,खाजगी वैद्यकीय अधिकारी व संस्थांचा सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामकाजा बद्दल प्रत्येक झोन मधील वैद्यकीय अधिकारी आशा वर्कर यांचा सन्मान करण्यात आला. वाय. सी. एम. मधील नर्सच्या समूहाने करूया जागर क्षयरोग मुक्तीचा हा पोवाडा सादर करून गीताच्या माध्यमातून जनजागृती केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सरवदे, किशोर गवळी, रेशमा परब आणि आभार गोपाल कांबळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.