Pimpri News : उघडे फिडर पिलर ठरताहेत धोकादायक ; सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – महावितरणचे उघडे फिडर पिलर धोकादायक ठरत आहेत. गंज लागलेल्या फिडर पिलर, कुलूप न लावल्यामुळे तशाच उघडे पडल्या आहेत, तर काही फिडर पिलरचा एक किंवा दोन्ही दरवाजे तुटून गेले आहेत. ठिकठिकाणी असलेले असे फिडर पिलर धोकादायक ठरत आहेत.

रहदारीच्या रस्त्यावर आणि वसाहतीत असलेले या उघड्या फिडर पिलरमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. रोहित्र जळून जीवित हानी झाल्याच्या घटना यापूर्वी शहरात घडल्या आहेत. उघड्या फिडर पिलरकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.

शहरातील अशा फिडर पिलरचे सेफ्टी ऑडिट करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी गावठाण परिसर, पिंपरीगाव, चिंचवडगाव तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी फिडर पिलर उघडे आहेत. या परिसरातील फिडर पिलरचे सेफ्टी ऑडिट करावे, उघडे बॉक्स कुलुप बंद करून आयएसआय मानकाप्रमाणे फ्युज लावावेत आणि असे पिलर धोकादायक ठरणार नाहित अशा उंचीवर लावावेत, अशी मागणी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान याबाबत महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, अशा असुरक्षित आणि उघड्या पडलेल्या फिडर पिलरची पाहणी करून ते बदलण्याचे काम महावितरण करत असते. पिलरचे दरवाजे चोरीला जात असल्याचे समोर आले आहे.

संबधित भागातून तक्रार आल्यास आम्ही पिलर दुरुस्त करतो. नागरिकांनी अशा असुरक्षित पिलर जवळ जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.