Pimpri news: ‘ऑक्सिजन फ्लो’ मशीन थेट खरेदीस विरोध केल्याने पालिकेस 30 मशीन मिळणार मोफत – सुलक्षणा धर

महापालिकेचा दीड कोटींचा फायदा झाल्याचा दावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाने ठेकेदारास डोळ्यासमोर ठेवून थेट पद्धतीने ‘ऑक्सिजन फ्लो’ मशीन खरेदी करण्याचा घाट घातला होता. मात्र, त्याला प्रखरपणे विरोध केल्याचा पालिकेला फायदा झाला आहे. संबंधित ठेकेदाराकडून पालिकेला 30 मशीन मोफत मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांनी सांगितले. तसेच महापालिकेचा दीड कोटींचा फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रात नगरसेविका धर यांनी म्हटले आहे की, महापालिका खरेदी करत असलेल्या ऑक्सिजन फ्लो मशिनची किंमत केवळ 90 हजार ते 1लाख 25 हजार रुपयांपर्यंत आहे.

अशा 130 मशीन महापालिका प्रति मशीन 2 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करत असल्याचे निदर्शनास आल्याने या खरेदी प्रक्रियेस विरोध केला.

संबंधित मशीन महापालिकेने ताब्यात घेण्याआधीही आयुक्तांकडे या खरेदी बाबत विरोध केला होता. 24 ऑगस्ट रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अधिकृतरित्या पत्राद्वारे याबाबत विरोध दर्शविला.

त्या पत्रास 27 ऑगस्ट रोजी आयुक्तांकडून उत्तर देण्यात आले. ज्यात दरांची पडताळणी करून संबंधित ठेकेदाराकडून 130 मशीन 2 लाख 50 हजार रुपये प्रति मशीन खरेदी करणे कायदेशीररित्या योग्य असून महापालिकेच्या फायद्याचे आहे असे सांगण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

शिवाय संबंधित कंपनी 130 मशीन व्यतिरिक्त अन्य 30 मशीन मोफत महापालिकेस देणार आहे. पहिल्या वर्षाची आणि पाचव्या व सहाव्या वर्षाचे मेंटेनन्स आणि सर्व्हिस मोफत करून देणार असल्याची माहितीही आयुक्तांनी पत्राद्वारे कळविली होती.

या खरेदी प्रक्रियेला केलेल्या प्रखर विरोधामुळे महापालिकेला 30 मशीन मोफत मिळत असून 1 कोटी 46 लाख 83 हजार 920 रुपयांचा थेट फायदा झाला असल्याचे दिसून येत आहे.

स्थायी समिती सभेत या विषयास मंजुरी मिळाली. संबंधित कंपनीकडून 30 ऐवजी 50 मशीन मोफत मिळाव्यात, अशी मागणी केली असल्याचे धर यांनी सांगितले.

स्थायी समिती सदस्या म्हणून काम करत असताना शहरातील नागरिकांच्या कररूपी पैशांचा योग्य वापर व्हावा. तसेच पारदर्शकरीत्या कोणतीही खरेदी व्हावी, यासाठी प्रयत्न करणे हे मी माझे कर्तव्य समजते.

त्या उद्देशानेच ह्या विषयाला मी विरोध केला होता अजूनही महापालिकेच्या वतीने होणाऱ्या इतर चुकीच्या खरेदी प्रक्रियेबाबत वेळोवेळी आवाज उठवणार असल्याचे धर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1