Pimpri News : मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना विनासायास प्रवेश मिळावा – प्रदीप नाईक 

एमपीसी न्यूज – सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात सहजरित्या प्रवेश मिळत नाही. मंत्रालय हे सर्वांसाठी आहे याठिकाणी प्रत्येकाला विनासायास प्रवेश मिळावा, आशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता प्रदीप नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात नाईक म्हणतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व सामान्य नागरिक रखडलेली कामे घेऊन मंत्रालयात येतात. पण, सुरक्षा रक्षक त्यांची दारावरच अडवणूक करून मंत्र्यांना भेटण्यास मज्जाव करतात. याउलट एखाद्या धनिकास लगेच प्रवेश मिळतो. घटनेमध्ये सर्व सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानले आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे.

मंत्रालयात घटनेतील समानतेच्या तत्वाचे उल्लंघन होते. याठिकाणी प्रत्येकजण आपली समस्या घेऊन येत असतो. मंत्रालय कुणाचीही जाहगीर नाही. त्यामुळे नागरिकांच्या कामांना प्राधान्य देत त्यांना विनासायस मंत्रालयात प्रवेश मिळावा, अशी मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.