Pimpri news : टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागातर्फे विद्याधनम् उपक्रमांतर्गत आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज- कबड्डी या क्रिडा प्रकरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरी व ग्रामीण खेळाडूंना संधी मिळावी, या उद्देशाने श्री. सुमंत मुळगावकर आंतरशालेय कबड्डी स्पर्धांचे रविवारी (दि.22) आयोजन (Pimpri News) करण्यात आले होते. या स्पर्धा टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागातर्फे विद्याधनम या उपक्रमांतर्गत घेण्यात आल्या. ज्यामध्ये ग्रामीण व शहरी भागातील टाटा मोटर्स संलग्न शाळा व स्पोर्ट क्लासच्या एकूण 10 शाळांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत स्वरुपवर्धीनी या पुण्यातील शाळेने प्रथम क्रमांक पटकवला आहे. तरशिवे या गावातील ज्ञानदीप विद्यालय यांनी द्वितीय क्रमांक तसेच भांबोली येथील भामचंद्र विद्यालययांनी तिसरातर आबोंली येथील आदर्श विद्यालय यांनी चौथा क्रमांक पटकवला आहे. यावेळी एचआर प्रमुख पी. श्रीनीवासआंतरराष्ट्रीय कब्बडी पंच दत्ता बाबुराव झिंजुर्डे व क्रिडा अध्यक्ष शशीकांत कात्रे यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व स्पोर्ट वेअर देण्यात आले.

Alandi News : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरूवात

 

या स्पर्धा रविवारी टाटा मोटर्स कबड्डी मैदान येथे सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचार या कालावधीत पार पडल्या. विजेत्या शाळेबरोबरच या स्पर्धेत  भैरवनाथ विद्यालयश्री सुमंत विद्यालयआदर्श विद्यालय शिरोळीभाऊसाहेब राऊत विद्यालयन्यू इंग्लिश स्कूलसेवा सहयोग या शाळाही स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

टाटा मोटर्स कंपनीच्या सी एस आर विभागाच्या विद्याधनम प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्य केले जातात. त्याचअनुषंगाने या वर्षी विद्यार्थ्यांच्या मनात खेळाविषयी रुची निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी विभागीयजिल्हास्तरीयराज्यस्तरीयराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन क्रीडा क्षेत्रात आपले भविष्य घडवावेया हेतूने या वर्षी पहिल्यांदाच कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा सुरळीतपणे होण्यासाठी टाटा मोटर्स सोबत शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित संस्था सहकार्य करत आहेत.कंपनीच्या वेगवेगळ्या विभागाच्या प्रमुखांनी यात प्रत्येकी एक एक शाळेला प्रायोजित (Pimpri News) केले आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंना भविष्यात टाटा मोटर्स तर्फे प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.