रविवार, जानेवारी 29, 2023

Pimpri News : महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन 

एमपीसी न्यूज –   महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांमध्ये सामाजिक उपक्रम (Pimpri News )राबविण्यात आले.

तसेच श्रद्धा गार्डन मोरे वस्ती येथील स्वस्तिक बालविकास सेवा अंगणवाडी येथील मुलांसाठी 19 जानेवारी या दिवशी खाऊ वाटप या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शारदा सोनवणे, हेमलता म्हात्रे , शालीनी चिंचोळकर यांनी आयोजनात सहभाग घेतला आणि उपक्रम यशस्वी केला.

Chikhli News : चिखली जलशुद्दीकरण केंद्रासमोरून 23 पाईप चोरीला

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वल्लभनगर येथील एच ए स्कूल येथे 19 जानेवारी या दिवशी शिक्षकांसाठी तर पिंपरतील एच ए स्कुल, (माध्यमिक विभाग) पिंपरी पुणे येथील मुलांसाठी 13 जानेवारी या दिवशी योग शिबीर घेण्यात आले. यामध्ये नियमित योगासने करण्याचे फायदे (Pimpri News )मुलांना सांगितले आणि प्रात्यक्षिक करून दाखवले.

महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय हि एक अध्यात्मिक संस्था असून विविध विषयांवर संशोधनाचे कार्य करते तसेच सामाजिक जाणीव जोपासली जावी या करीता संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते.यामध्ये प्रथमोपचार शिबीर,शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप,आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रम (Pimpri News )नियमित घेतले जातात.

Latest news
Related news