Pimpri News : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धेचं आयोजन

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2021 सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू आहे.

स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

महापालिका क्षेत्रामधील नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा व कॉलेज ‍विद्यार्थी यांनी  घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी मोहिम, कोवीड -19, इ. स्वच्छता विषयक बाबींबाबत निबंध, चित्रकला, घोषवाक्य पिंपरी चिंचवड महापालिकेच्या [email protected] 

या ईमेल आयडी वर 30 सप्टेंबर पर्यंत पाठवता येणार आहेत.

प्राप्त होणा-या साहित्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येतील.

शहरातील जास्तीत जास्त नागरीक, संस्था यांनी सहभाग नोंदवून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.