Pimpri : वृत्तपत्र विक्रेत्यांचा खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तसेच शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा डौलाने फडकविण्यासाठी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरले आहेत. वृत्तपत्र विक्रेत्यांना धनुष्यबाणासमोरिल बटन दाबुन प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन युवराज दाखले व शिवसेना विभागप्रमुख प्रदीप दळवी यांनी केले.

यावेळी वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष प्रवीण माने, उपाध्यक्ष शंकर हारपडे, नेताजी कस्पटे, मारूती कस्पटे, बंन्टी भावसार, राहुल सूर्यवंशी, कमलेश करेकर, पिंपरी मधील अशोक झांजले, रमेश ताजने, सुभाष पवार, रमेश आदमाने, कृष्णा इंगावले, शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, नवनाथ जाधव, आशिष वाळके, मारूती मस्के, रमेश दाखले, वैभव मठपती, दत्ता गिरी, शिवसेना विभागसंघटक अंकुश कोळेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.