Pimpri News: पालकांनो लहान मुलांची काळजी घ्या, कोरोना वाढतोय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मार्च मध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात मार्च मध्ये 1 ते 10 वयोगटातील 1 हजार 709 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 11 ते 20 या वयोगटातील 2596 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. मुलांना कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सुरुवातीला जेव्हा कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हा मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण हे कमी होते. परंतु, मागील काही दिवसांपासून गृह विलगिकरणाचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत शहरातील 70 टक्के रुग्ण हे गृह विलगिकरणात उपचार घेत आहेत. यामुळे मुलांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

मार्च महिन्यात 1 ते 10 या वयोगटातील 1 हजार 709 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 5, 6 या वयोगटातील मुलांचे प्रमाण जास्त आहे. मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले असले. तरी, मृत्यूचे प्रमाण कमी आहे. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्याने बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घशाला सूज येणे अंग दुखी, अशक्तपणा मुलांमध्ये लक्षणे दिसत आहेत. मार्च महिन्यात 1 ते 10 या वयोगटातील 1 हजार 709 आणि 11 ते 20 वयोगटातील 2596 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पालकांनी मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवताना काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.