Pimpri News : स्वच्छोत्सव अंतर्गत महिलांचा सहभाग वाढविणार

एमपीसी न्यूज –  स्वच्छ भारत अभियानअंतर्गत महिलांचा स्वच्छतेमधील (Pimpri News ) सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृध्दींगत करण्यासाठी शहरामध्ये 30 मार्च पर्यंत स्वच्छोत्सव 2023 अभियान घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत ‘वुमन आयकॉन्स लीडिंग स्वच्छता पुरस्कार’ देण्यात येणार असून महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

 

 

स्वच्छोत्सव 2023 अंतर्गत स्वच्छता जागृती फेरी, स्वच्छता शपथ आणि जागतिक शुन्य कचरा असे विविध उपक्रम राबविले जात आहे. वूमन आयकॉन्स लिडिंग स्वच्छता पुरस्कारासाठी शहरातील महिला बचत गट, लघु उद्योग, नवोदित उद्योजिका, स्वयंसेवी संस्था, वुमन एन्टरप्रेनीयर्स व चेंज एजन्टस आदी श्रेणीत स्वच्छतेविषयक कामकाज करणाऱ्या महिला अथवा महिला समुदाय सहभागी होऊ शकतात. त्यासाठी सहभागी महिला अथवा महिला गटाने यांनी पुढील नमूद कार्यक्षेत्रामध्ये काम केलेले सहभागी असावे.

 

 

 

Pune Crime News : हुंडाई शोरूममधील कर्मचाऱ्याने बनावट गेट पासवर 46 गाड्या विकत केला कोट्यवधींचा अपहार

 

 

स्वच्छता विषयक कामकाज, समुदाय यांनी सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे व्यवस्थापन, सेप्टीक टँक स्वच्छताविषयक कामकाज, मलनि:सारण प्रक्रिया कामकाज, महापालिका कचरा संकलन व वाहतूक, एमआरएफ सेंटर, वेस्ट टु वेल्थ प्रोडक्‍ट, घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया, क्षमता बांधणी आणि जनजागृती, टेक्‍नॉलॉजी आणि इनोव्हेशन, स्वच्छता विषयाशी संबंधित इतर क्षेत्रातील कामकाज आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

 

स्पर्धेच्या प्रवेशिका महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. स्पर्धकांनी जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाकडे प्रवेशिका सादर कराव्यात. या स्पर्धेमध्ये प्रवेशिका भरण्याची मुदत पाच एप्रिलपर्यंत राहील. त्यातील छाननी करून महिला बचत गट, लघुउद्योग, नवोदित उद्योजिका, स्वयंसेवी संस्था यांच्या श्रेणीतून एक सर्वोत्तम प्रवेशिकेचे (Pimpri News )नामनिर्देशन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.