Pimpri corona Update : रुग्णवाढ कायम; शहरात आज 505 नवीन रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही

'ब' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 101 नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे.  शहराच्या विविध भागातील 483 आणि महापालिका हद्दीबाहेरील 22 अशा 505 नवीन रुग्णांची आज  (बुधवारी) नोंद झाली.  ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 101 नवीन रुग्ण सापडले. 

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 155 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली. तरी, मृत्यूचे प्रमाण कमी आहे.  शहरात आज एकही मृत्यू झाला नाही. हे आशादायक चित्र मानले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात आजपर्यंत 1 लाख 6728 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 1100 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1850 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 776 अशा 2626 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1398 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 918 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 26 हजार 602 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 1844 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.