Pimpri News: महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज – ‘सीओ’ केडरचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी राजीनामा दिला आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेत रुजू झाल्यानंतर महिन्याभराच्या आतच त्यांनी राजीनामा दिला आहे.

वसई-विरार महापालिकेतून सहाय्यक आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांची पदोन्नतीने 18 जानेवारी 2021 रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेत बदली झाली होती. 19 जानेवारी रोजी वसई-विरार महापालिकेतून ते कार्यमुक्त झाले होते.

_MPC_DIR_MPU_II

व्यंकटेश दुर्वास यांना पिंपरी महापालिकेत 25 जानेवारी रोजी रुजू करुन घेण्यात आले. त्यांच्याकडे माहिती व जनसंपर्क आणि पशुवैद्यकीय विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. मात्र, महापालिकेत रुजू झाल्यानंतर महिन्याभराच्या आतच दुर्वास यांनी राजीनामा दिला.

आपण वैयक्तिक कारणास्तव मुख्याधिकारी ‘गट-अ’ या पदाचा 22 फेब्रुवारी 2021 रोजी राज्य सरकारकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे मी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर काम करु शकत नसल्याचे दुर्वास यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्राद्वारे कळविले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.