Pimpri News: ओमायक्रॉनची धास्ती; निर्बंध लागणार का, आयुक्त म्हणतात…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ओमायक्रॉनची लागण झालेले 6 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यावर महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पुढील परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत योग्य ते निर्णय घेतला जाईल. यापुढे मेळाव्यांना परवानगी दिली जाणार नाही.

नायजेरिया या देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या 3 जणांमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू ‘ओमायक्रॉन’ची लक्षणे आहेत. तर, त्यांच्या संपर्कातील 3 जणांही ‘ओमायक्रॉन’ची लागण झाली आहे. या 6 जणांपैकी केवळ 1 रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आहेत. उर्वरित 5 जणांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत.

ओमायक्रॉनमुळे पुन्हा नव्याने निर्बंध लागणार का असे विचारले असता आयुक्त पाटील म्हणाले, ओमायक्रॉनची लागण झालेले सहाही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने सर्व निर्बंध शिथील केले होते. जनजीवन पूर्वपदावार आले होते. सर्व व्यवहार सुरळीत होते. नागरिकांनी घाबरुन जावू नये. लस घ्यावी, मास्कचा नियमित वापर करावा. सुरक्षित अंतराचे पालन करावे. पुढील परिस्थितीनुसार निर्बंधबाबत अवलंबून राहील. तुर्तास यापुढे मेळाव्याला परवानगी दिली जाणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.