Pune news: ‘पीसीएनटीडीए’च्या सदनिका अर्ज नोंदणीचा उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या 4 हजार 883 सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज बारामती हॉस्टेल येथे करण्यात आला.

या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सदनिका प्रकल्पाची माहिती देणारी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. तसेच पेठ क्रमांक 12 प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहप्रकल्पातील निवासी सदनिका विक्रीच्या अटी व नियमांच्या माहिती पुस्तेकेचे प्रकाशन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अंतर्गत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी येथील पेठ क्रमांक 12 येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत  गृहप्रकल्पाची उभारणी केली जात आहे.

या गृहप्रकल्पामध्ये रस्ते, वीज, पाणीपुरवठा, शाळा, पोलीस चौकी, दुकाने, उद्याने, टपाल कार्यालय, बससेवा दवाखाना यासारख्या  नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत.

या विकसित करण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पातील निवासी सदनिका विक्री करण्यासाठी इच्छुक व पात्र नागरिकांकडून अर्ज मागविण्याच्या येत आहेत. या नोंदणी प्रक्रियेला आज प्रारंभ करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.