Pimpri News: खासगी प्रशिक्षण संस्थांसह नववी पुढील क्लासेस सुरु करण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व खासगी प्रशिक्षण संस्था तसेच इयत्ता नववीपासून पुढील कोचिंग क्लासेस सुरु करण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. तर, उद्याने सकाळी 6 ते 9 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरु राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

लाईट हाऊस, कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग व संगणक प्रशिक्षण संस्था, सरकारी व खासगी वाचनालये व अभ्यासिका सुरु करण्यास काल शुक्रवारपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच नववी पुढील कोचिंग क्लासेस सुरु करण्यासही परवानगी दिली आहे.

प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. या संस्थानी प्रशिक्षणार्थींची क्लासमध्ये प्रवेश करताना थर्मलगनद्वारे नियमीत तपासणी करावी. विद्यार्थ्यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.

प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोविड चाचणी करण्यात यावी. दोन प्रशिक्षणार्थींमध्ये सामाजिक अंतर ठेवावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.