Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहराला अमंलीपदार्थाचा विळखा, वर्षभरात दोन कोटींचे अंमलीपदार्थ जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सध्या तरुणाईला अंमली (Pimpri News) पदार्थाचा विळखा बसत असून पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या वर्षभरात तब्बल 2 कोटी 18 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. ज्यामध्ये गांजा, ब्राऊन शुगर, अफिम, डुडा चुरा यांचा समावेश आहे.

ओडीसा, पूर्व आंध्र प्रदेश मधून गांजा, राजस्थान आणि पाकिस्तान सीमेवरून अफिम, मुंबई आणि इतर ठिकाणाहून ब्राऊन शुगर विक्रीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अंमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरात धडाकेबाज कारवाया केल्या. अंमली पदार्थ विरोधी पथकाने 81 कारवायांमध्ये 154 जणांना अटक करत त्यांच्याकडून गांजा, ब्राऊन शुगर, अफिम, डुडा चुरा असा दोन कोटी 18 लाख 54 हजार 825 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

 

Pune Crime News : जॉबच्या शोधात असणाऱ्या तरुणीला वेश्याव्यवसायाची ऑफर, नकार देताच केला विनयभंग

मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन 2021 मध्ये 59 गुन्ह्यांमध्ये 111 आरोपींना अटक करण्यात आली. त्यात 175.307 किलो गांजा, 18 ग्राम चरस, 90.85 ग्रॅम ब्राऊन शुगर असा 69 लाख 53 हजार 89 रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तर सन 2022 मध्ये 81 गुन्ह्यांमध्ये 154 जणांना अटक केली. त्यांच्याकडून 613.717 किलो गांजा, 133 ग्रॅम ब्राऊन शुगर, 808 ग्रॅम अफिम, 115.141 किलो डुडा चुरा असा दोन कोटी 18 लाख 54 हजार 825 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांजा सेवन प्रकरणी 31 गुन्ह्यात 53 जणांना अटक करून त्यांच्याकडून 3 हजार 680 रुपये किमतीचा 241 ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

निगडी ओटास्कीम होतेय गांजा विक्रीचे हब

निगडी मधील ओटास्कीम येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने शहर पोलीस दलातील सर्व गुन्हे शाखांनी एकाच वेळी ओटास्कीम परिसरात छापे मारले. त्यात तीन महिलांवर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई केली. तर तिघांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विक्रीसाठी गांजा पुरविणाऱ्या मुख्य डीलरपर्यंत पोहोचून त्यास अटक करून अंमली पदार्थ विरोधी पथकाने ती साखळी नष्ट केली आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या 10 जणांना वर्षभरात तडीपार करण्यात आले.

Pune Crime News : इन्स्टाग्रामवर झालेली ओळख महिलेला पडली चांगलीच महागात,14 लाख रुपयांची फसवणूक

जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांकडून नष्ट केला जातो. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पंचांच्या समक्ष सर्व अंमली पदार्थ नष्ट केले जातात. अंमली पदार्थ विरोधी पथकाने यासाठीची प्रक्रिया (Pimpri News) सुरु केली आहे. न्यायालयाकडे अर्ज केल्यानंतर ठिकाण आणि वेळ निश्चित केली जाते. पुरेशी सुरक्षा आणि उंच बॉयलर असणाऱ्या कंपनीत हे अंमली पदार्थ नष्ट केले जाणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.