Pimpri news: पिंपरी-चिंचवड न्यायालय स्थलांतराच्या कामाला वेग

एमपीसी न्यूज – अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिंपरी न्यायालय सीनिअर डिव्हिजन व सेशनकोर्ट चालु करण्यासाठी लागणारे फर्निचर तयार करण्यासाठी पिंपरी महापालिकेने मान्यता दिली आहे. त्यामुळे न्यायालय स्थलांतराच्या कामाला वेग आला आहे. निविदा काढून येत्या 15 दिवसामध्ये हे कामकाज चालू होणार आहे. हे कामकाज जुनपर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही आयुक्त राजेश पाटील यांनी बार असोसिएशनला दिली.

पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ यांनी आयुक्त पाटील यांची भेट घेतली. फर्निचरची निविदा काढण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी सांगितला होता. तो कमी करण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांची नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह सर्व ॲडव्होकेट बार असोशिएशनच्या कार्यकारणीने भेट दिली. तसेच या कामकाजाबद्दल चर्चा केली.

त्यावेळी हे कामकाज लवकरात लवकर पुर्ण करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे, सचिव ॲड. महेश टेमगिरे, महिला सचिव मोनिका गाढवे, ॲाडिटर ॲड. धनंजय कोकणे व ॲड. प्रविण बोडके व ॲड. मुकुंद ओव्हाळ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.