Pimpri News : मनसे जनहित व विधी कक्षाची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर

एमपीसीन्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित व विधीकक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जनहित कक्षाची पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी जाहीर करण्यात आली. यावेळी विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

मनसे जनहित व विधी कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयात नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जनहित कक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राजू भालेराव उपस्थित होते.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे पिंपरी विधानसभा : सुशिल सोनकांबळे – विभाग अध्यक्ष, निलेश कांबळे – उपविभाग अध्यक्ष, महेंद्र निशीगंध – उपविभाग अध्यक्ष, शिशिर महाबळेश्वकर – उपविभाग अध्यक्ष, युवराज शिंदे – प्रभाग अध्यक्ष, संजय मोरे – प्रभाग अध्यक्ष

चिंचवड विधानसभा : विवेक नेरलेकर – उपविभाग अध्यक्ष, अनिल दहिभाते – प्रभाग अध्यक्ष, संजय पंडित – प्रभाग अध्यक्ष, राजेश येवते – प्रभाग अध्यक्ष.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.