Pimpri News : ‘पिंपरी चिंचवड महापालिका शाळांना ‘आयएसओ’ दर्जा मिळावा’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळा ‘आयएसओ’ मानांकीत करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले यांनी केली आहे.

याबाबत चखाले यांनी पालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पालिकेअंतर्गत 140 ते 145 प्राथमीक शाळा आहेत. यामधे 128 मराठी, 9 इंग्रजी, तर 7 उर्दू शाळा आहेत. या शाळांत गरिब घरातील आणि झोपडपट्टी भागात राहणारे विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, या शाळांमध्ये मुलांना दर्जेदार शिक्षण मिळते का हे तपासून पाहण्याची गरज आहे.

खासगी शाळांमध्ये उत्तम शिक्षण व सुविधा मिळतात. त्या तुलनेत पालिकेच्या शाळांमध्ये देखील दर्जेदार शिक्षण व सुविधा मिळाव्यात तसेच मुलांना पालिकेच्या शाळेत शिक्षण घेण्याची आवड निर्णाण व्हावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळा ‘आयएसओ’ मानांकीत कराव्यात, अशी मागणी चखाले यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.