Pimpri News : सायक्लोथॉन स्पर्धेत पिंपरी चिंचवडची देशभरातील 11 शहरांमध्ये निवड, 1 कोटींचे बक्षीस जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहराची Indian Cycles4change Challenge अंतर्गत सायक्लोथॉन स्पर्धेत देशभरातील 11 शहरांमध्ये निवड झाली आहे. यामुळे शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे. 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले असल्याची माहिती महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

भारत सरकारच्या Cycles4change Challenge च्या या उपक्रमात पिंपरी-चिंचवड शहराची देशातील 110 शहरांमधून प्रथम पहिल्या 25 शहरांमध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक सांगवी फाटा- साईचौक या मार्गावर केले होते. त्याचे पुन्हा Cycles4change Challenge आयोजकांकडे Webinar द्वारे सादरीकरण जून 2021 रोजी करण्यात आले होते.

त्यावरील प्रश्नोत्तरे व सादरीकरणाच्या आधारे भारतातुन पहिल्या 11 शहरांमध्ये पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून 2 शहरांची निवड झाली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे.

भारत सरकारच्या Cycles4change Challenge या उपक्रमाअंतर्गत पहिल्या 11 शहरांमध्ये निवड झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरास 1 कोटीचे बक्षीस जाहीर झाल्याने शहराच्या नावलौकीकात भर पडली असून ही शहरवासीयांसाठी गौरवाची बाब आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.