Pimpri News: पिंपरी-चिंचवड होणार सायकलीचे शहर

Pimpri News: Pimpri-Chinchwad to be a bicycle city ऑनलाईन सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांकडून सायकल मार्गिकांच्या संदर्भात सूचना मागवण्यात येत आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सायकलीचे शहर होणार असून महापालिकेकडून सायकल मार्गिकांच्या निर्मितीसाठी ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरण रक्षणासाठी वाढवू सायकलचा वापर असा नारा देत शहरात सायकल मार्गिका तयार करण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण सुरू केले आहे. ऑनलाईन सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांकडून सायकल मार्गिकांच्या संदर्भात सूचना मागवण्यात येत आहेत.

महापालिकेने नागरिकांना पीसीएमसी स्मार्ट सारथी अ‍ॅप डाउनलोड करून सायकल मार्गिका निर्मितीसाठी #Cycles4Change सर्वेक्षण भरण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.