Pimpri News : तोडफोड करणाऱ्या आरोपींची पिंपरी पोलिसांकडून धिंड

एमपीसी न्यूज – नेहरूनगर येथे 30 ऑक्टोबर रोजी 100 जणांच्या टोळक्याने तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत एकावर खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेनऊ वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. यातील पाच जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली.

आशिष जगधने (वय 31), इरफान शेख (वय 30), जितेश मुंजळे (वय 28), जावेद औटी (वय 29), आकाश हजारे (वय 30) यांच्यासह 20 जणांना अटक केली आहे. तर 14 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या आरोपींसह 100 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश सुभाष जाधव (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली. आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेले. पोलिसांनी या घटनेत 17 वाहने जप्त केली आहेत.

वाकड पोलिसांनी तोडफोड करणा-या आरोपींची धिंड काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पिंपरी पोलिसांनी नेहरूनगर परिसरात तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली.

पिंपरीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे म्हणाले, आरोपींना घटनास्थळी नेऊन पाहणी करण्यात आली. घटनास्थळी पोलिसांचे वाहन जात नसल्याने त्यांना चालत नेण्यात आले. आरोपींना घटनास्थळी नेऊन पाहणी करणे हा तपासाचा भाग आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.