Pimpri News : कोरोना योद्धयाच्या वाढदिवसानिमित्त 15 दात्यांचे प्लाझ्मा दान

0

एमपीसीन्यूज : सामाजिक कार्यकर्ते तथा यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील वाहन चालक मारूती जाधव या कोरोना योद्धयाच्या वाढदिवसानिमित्त 15 दात्यांनी कोविड प्लाझ्मा दान केले. तसेच वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले.

वाहन चालक मारूती जाधव या कोरोना योद्धयाच्या पुढाकारातून व  आमदार महेश लांडगेव डॉ. विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल  रक्तपेढीत या प्लास्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  कोरोना योद्धा मारुती जाधव यांच्यासह अन्य 15 दात्यांनी प्लाझ्मा दान केले.

_MPC_DIR_MPU_II

या प्लाझ्मा दानातून कोरोनाग्रतांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार असून प्लाझ्मा दात्यांनी दाखवलेल्या सहकार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते यशवंत कण्हेरे यांनी त्यांचे आभार मानले. तसेच कोरोना रुग्णांसाठी अजूनही दात्यांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्यामुळे प्लाझ्मा दान करू इच्छिणाऱ्या दात्यांनी पुढे यावे, असे आवाहन शिवानंद चौगुले यांनी केले.

आमदार लांडगे यांच्या  हस्ते न्यु भोसरी रूग्णालय, भोसरी येथे वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आले.    डॉ. विनायक पाटील, डॉ. ढगे,  डॉ. वैभव म्हस्के, डॉ. ज्ञानेश पाटील तसेच प्रसाद ढमढेरे, विशाल गरड व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment