Pimpri News : ‘खेळाडू दत्तक योजनेसाठी एक मार्चपासून करा अर्ज’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 2012-13 या आर्थिक वर्षापासून मनपा परिसरातील विद्यार्थी, खेळाडूंसाठी नव्याने खेळाडू दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. 2020-21 च्या दत्तक योजनेसाठी 11 खेळ प्रकारांची निवड करण्यात आली असून, एक मार्चपासून या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

समाविष्ट केलेल्या 11 खेळांमध्ये ॲथलेटिक्स, हॉकी, खो-खो, बॉक्सिंग, नेमबाजी, बॅडमिंटन, क्रिकेट, जलतरण, कबड्डी, कुस्ती व लॉन टेनिस यांचा समावेश आहे.

इच्छूक खेळाडूंना क्रीडा विभाग, स.नं. 135/2, 15 प्रेमलोक, 1 ला , मजला, प्रेमलोक पार्क बस स्टॉप समोर, चिंचवड येथून 8 ते 22 फेब्रुवारी या काळात विहित नमुन्यातील अर्ज अथवा म.न.पा.च्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर अर्ज डाऊन लोड करता येईल.

संबंधित अर्ज आवश्यक कागदपत्रांसह 1 ते 22 मार्च या कालावधीत प्रेमलोक पार्क येथील क्रीडा विभागाच्या कार्यालयात जमा करता येईल.

योजनेच्या अटी आणि शर्ती बाबत पालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याचे पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.