Pimpri News : ‘पीएमपी’च्या नेहरूनगर आगारात ‘राष्ट्रीय सुरक्षा सुरक्षा अभियानां’तर्गत चालक-वाहकांना मार्गदर्शन

एमपीसीन्यूज : पीएमपीएमएलच्या पिंपरी- नेहरूनगर आगारामध्ये 32  व्या ‘राष्ट्रीय सुरक्षा अभियानां’तर्गत चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांची प्रबोधनपर बैठक घेण्यात आली. यावेळी कर्मचाऱ्यांना वाहतूक सुरक्षा नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरक्षा नियमाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डाॅ. राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी- नेहरूनगर आगारामध्ये 32  व्या ‘राष्ट्रीय सुरक्षा अभियानां’तर्गत चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांची प्रबोधनपर बैठक घेण्यात आली.

यावेळी पिंपरी वाहतुक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कुंटे व पीएमपीचे पिंपरी मुख्यालय हेड क्वार्टर क्र.2चे समन्वयक अधिकारी, तसेच आगार प्रमुख संतोष माने यांनी सर्व कामागारांना रस्त्यावर वाहने कशी चालवावी या विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी आगार अभियंता राजकुमार माने, वरिष्ठ लिपीक मिलिंद शेवाळे, प्रकाश मोकाशी, विष्णु रायकर, राजेंद्र बोरकर, सुनिल काकडे, दिलिप गायकवाड, कार्यशाळेचे पर्यवेक्षक राजाराम थोरवे, भोसरी BRT प्रमुख काळुराम लांडगे आदी उपस्थित होते.

उपस्थित कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरक्षा नियमाबाबत सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.