Pimpri News : शब्दधन काव्यमंचाचे काव्य पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज -शहरातील कवी व लेखकांना प्रेरणा मिळावी यासाठी शब्दधन काव्यमंच यांच्यावतीने दरवर्षा काव्यपुरस्कार दिला जातो. यावर्षीचा शब्दप्रतिभा पुरस्कार कवी , लेखक व प्रसिद्ध निवेदक उद्धव कानडे यांना जाहीर झाला आहे.

तसेच, गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार गझलकार, कवी, लेखक रघुनाथ पाटील यांना, तर कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ कवी बाबू डिसोझा यांना जाहिर करण्यात आला आहे.

शब्दधनचा छावा काव्य पुरस्कार खालील साहित्यिकांना जाहीर करण्यात आला आहे.

– एल्गार साहित्य परिषदेचे अध्यक्ष, कवी महेंद्रकुमार गायकवाड
– कवी, लेखक दत्तात्रय श्रीकांत गुरव (चक्रेश्वरवाडी, कोल्हापूर)
– कवी शामराव सरकाळे
– कवयित्री फुलवती जगताप
– हास्यकवी, हरहुन्नरी कलाकार नंदकुमार कांबळे

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यावर्षीचा काव्य पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येईल, अशी माहिती शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण आणि सचिव माधुरी विधाटे यांनी दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.