Pimpri News : भारत बंदसाठी राजकीय पक्ष आणि कामगार संघटना आल्या एकत्र

आठ नोव्हेंबरच्या भारत बंदला पाठिंबा

एमपीसी न्यूज – दिल्लीत होत असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पिंपरी चिंचवड मधील राजकीय पक्ष आणि कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. आठ नोव्हेंबरला होणाऱ्या भारत बंदला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांच्या अध्यक्षते खाली आकुर्डी येथे आज (रविवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जनतेला भारत बंदसाठी आवाहन केले.

पिंपरी चिंचवड शहर आणि औद्योगिक परिसरात दिल्ली किसान आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, इंदिरा काँग्रेस सहित दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी भारत बंद मध्ये नागरिक, कामगार आणि व्यापाऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

याप्रसंगी बोलताना कैलास कदम म्हणाले, मंगळवारी (दि.8) सकाळी 11 ते 5 या वेळात देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी आंबेडकर चौक, पिंपरी येथे महाधरणे आंदोलन करण्यात येईल. शहरात बंद यशस्वी करण्यासाठी कामगार संघटना सर्व राजकीय पक्ष शहरातून मिरवणुका काढून पिंपरी येथे येतील असे कदम यांनी सांगितले

यावेळी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, इंदिराकाँग्रेस कैलास कदम, शाम आगरवाल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे गणेश दराडे, क्रांतिकुमार कडुलकर, अपर्णा दराडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल रोहम, शेतकरी कामगार पक्षाचे नितीन बनसोडे, छाया देसले, मानव कांबळे, सचिन देसाई, स्वप्नील जेवळे, मारुती भापकर, दिलीप पवार, गजानन चिंचवडे, भाई विशाल जाधव, संतोष रणसिंग, ऍड.चंद्रशेखर भुजबळ उपस्थित होते.

तसेच, स्वराज अभियान, सिटू, आयटक, बजाज कामगार संघटना, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, डीवायएफआय, घरकामगार संघटना, आरपीआय, प्रहार संघटना, छावा संघटना, शिवशाही व्यापारी संघ, महात्मा फुले समता परिषद, समाजवादी पक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती, बारा बलुतेदार संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.