Pimpri News: पॉझिटिव्ह न्यूज ! नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त, आज 1559 जणांना डिस्चार्ज

शहरात 784 नवे रुग्ण, 30 मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरूवारी) नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1559 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील 784 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 73 हजार 260 वर पोहोचली आहे.

शहरातील 16 जणांचा आणि पालिका हद्दीबाहेरील 14 अशा 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यात थेरगाव, कासारवाडी, मोशी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, मोशी, पिंपरी, निगडी, चिंचवड, भोसरी, काळेवाडी, च-होली, दिघी, वडगांवशेरी, हडपसर, धनकवडी, विठ्ठलवाडी, जुन्नर, वारजे, पाषाण, करमाळा, देहूरोड, आळंदी, देहूगाव, खंडाळा येथील रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

शहरात आजपर्यंत 73 हजार 260 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 59 हजार 544 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1206 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 412 अशा 1618 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 5063 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.