Pimpri News: संभाव्य तिसरी लाट! YCMH मध्ये बालरोग वॉर्ड तयार

एमपीसी न्यूज – संभाव्य तिसऱ्या  लाटेत लहान मुलांना अधिक असल्याचे सांगितले जात असल्याने लहान मुलामुलींना झालेल्या आजाराबाबत त्यांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी अतिशय कल्पकतेने वायसीएमएचमध्ये नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्याचा उपयोग लहान मुलामुलींसाठी भिंतीवरील पंचतंत्र गोष्टी व कार्टुन लावले आहेत. आजाराची तीव्रता कमी होण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होईल, असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे नवीन बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन महापौर ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर योगेश बहल, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, बालरोग विभागप्रमुख डॉ. दिपाली अंबिके, डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. राजेश कुलकर्णी, डॉ. सीमा सोनी, डॉ. सुर्यकांत मुंडलोड आदी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून बालरोग वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचा उपयोग कोरोना प्रतिबंधासाठी होणार आहे, अशी माहिती डॉ. वाबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.