Pimpri News : डी वाय पाटील रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरु

एमपीसी न्यूज -कोरोना संक्रमणातून उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना मुक्त झाल्यानंतरही अशा रुग्णांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्याबाबत योग्य उपचार व समुपदेशनाची गरज लक्षात घेऊन पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग ओपीडी क्र. 10 मध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे.

सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार ही सुविधा देण्यात येत आहे तसेच (टेलिमेडिसिन) दूरध्वनीद्वारे समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असून 02067116442 या क्रमांकावरून वरील वेळात संवाद साधता येईल.

कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक त्रास जाणवत आहेत. त्याचे निराकरण व्हावे यासाठी पोस्ट कोविड बाह्यरुग्ण विभागात औषधोपचार व मार्गदर्शनासाठी विशेष तज्ज्ञाची टीम गठित करण्यात आली आहे.

यामध्ये श्वसन संदर्भातील व्याधी, सामान्य आजार, हृदय, मज्जासंस्था, पोटाचे, त्वचेचे विकार, मानसिक विकार, आहार विषयक आदीबाबतीत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच पुन्हा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेत आपल्याला जाणवत असणऱ्या आरोग्य विषयीच्या समस्याबाबत योग्य उपचार घेऊन निरोगी आरोग्य प्राप्त व्हावे हा प्रमुख उद्देश घेऊन पोस्ट कोविड ओपीडी कार्यान्वित करण्यात आली आहे.

रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.