रविवार, जानेवारी 29, 2023

Pimpri News: प्रधानमंत्री आवाससाठी 15 डिसेंबरला सोडत

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) पंतप्रधान आवाससाठी 15 डिसेंबर 2022 रोजी लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात (Pimpri News) येणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयामार्फत पेठ क्र. 12 येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एलआयजी प्रवर्गातील 793 सदनिका व इडब्ल्यूएस प्रवर्गातील 31 सदनिका तसेच पेठ क्र. 30-32 येथील इडब्ल्यूएस (1 आर के) प्रवर्गातील 366 सदनिका व एलआयजी (1 बीएचके) प्रवर्गातील 414 सदनिकांचा सर्व सुविधांनीयुक्त असा प्रकल्प साकारण्यात येत आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी ऑनलाइन फॉर्म नोंदणीची समाप्ती झाली आहे.

पेठ क्र. 12 येथील एडब्ल्यूएस (1 बीएचके) प्रवर्गासाठी एकूण 316 लाभार्थ्यांनी व एलआयजीफ (2 बीएचके) प्रवर्गासाठी एकूण 262 लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे. तसेच पेठ क्र. 30-32 येथील इडब्ल्यूएसफ (1 आर के ) गटासाठी एकूण 37 लाभार्थ्यांनी (Pimpri News) व एलआयजी (1 बीएचके) प्रवर्गासाठी एकूण 155 लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे.

Chakan Talegaon Crime : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल

या नोंदणीनुसारची प्रारूप यादी 7 डिसेंबर 2022 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. या यादीबाबत काही हरकत असल्यास संबंधितांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी या कार्यालयाशी संपर्क करावा. अंतिम प्रारूप यादी ही 12 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच लॉटरीची सोडत 15 डिसेंबर रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात पार पडणार आहे.

Latest news
Related news