Talegaon News : प्रदीप नाईक यांचा अंनिस वर बंदी घालण्याचा अर्ज गृह विभागाकडे

एमपीसी न्यूज – हिंदूच्या भावनांना ठेच पोहचवणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर (Talegaon News) महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राज्य कार्यकारीणी सदस्य प्रदीप नाईक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली केली होती. या मागणीच्या अर्जाला गती मिळाली असून तो अर्ज राज्याच्या गृहविभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे.
निवेदनात प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे की, अंनिस ही संस्था स्थापनेपासून हिंदू देवी-देवतांना विरोध करण्याचे काम करत आहे. हिंदूच्या मंदिरांना व उत्सवांना कायम लक्ष्य केले जाते. अंनिस ही अंधश्रद्धा नाही तर हिंदू धर्म मिटवण्याच्या मागे लागली आहे. कारण अंधश्रद्धा केवळ हिंदू धर्मात नाही तर ती इतर धर्मात देखील आहे. मात्र अंनिस कधीही कोणत्याही मौलवी किंवा फादर, पोप यांना चॅलेंज करत नाही.
Chinchwad Crime : लोखंडी सत्तुरसह तरुणाला अटक
यापुढेही जोपर्यंत अंनिसवर बंदी येत नाही तोवर मी पाठपुरावा करत राहणार आहे. त्यांनी त्यांची हिंदू विरोधी धोरणे बदलली पाहिजेत. तेव्हांच मी माझा लढा थांबवेन. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हिंदू विरोधी कारवाई करण्यासाठी वित्तपुरवठा केला जात आहे का, समितीचे नेमके काम काय, इतर धर्मांच्या बाबतीत जागृतता का दाखवली जात नाही (Talegaon News) याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.