Pimpri News : प्रशांत पोरे यांनी साकारला मराठी भाषेतील पहिला परिपूर्ण ‘दीवान’

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवडचे रहिवासी प्रशांत पोरे यांच्या मराठी भाषेतील पहिला परिपूर्ण दीवान (विशिष्ठ बाबींची पूर्तता करणारा गझलसंग्रह) ‘दीवान-ए-प्रशांत’ गझलसंग्रह संपादित केला आहे.

गझलसम्राट सुरेश भट यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपल्या आई-वडिलांच्या हस्ते पोरे यांनी संग्रहाचे प्रकाशन केले.

मराठी भाषेत आजवर अनेक गझलसंग्रह आले आहेत. परंतु, परिपूर्ण असलेला हा मराठी भाषेतील पहिला दीवान आहे. आपल्या भाषेतील प्रत्येक वर्णाने अंत होणाऱ्या रदीफ व किमान एक गझल असलेल्या गझलसंग्रहास दीवान असे संबोधले जाते.

दीवान ही संकल्पना उर्दूमध्ये असून त्या भाषेत आजवर 76 दीवान लिहिले गेले आहेत. मराठी गझलेतील ह्या पहिल्या दीवानमध्ये एकूण 168 गझला असून उर्दूचे मशहूर शायर डॉ. संदीप गुप्ते आणि मराठी गझलेतील ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे यांनी संग्रहाची प्रस्तावना लिहिली आहे.

प्रशांत पोरे ह्यांनी मराठी भाषेत सर्वप्रथम हा दीवान साकार करून साहित्यक्षेत्रात पिंपरी चिंचवड शहराला मान मिळवून दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.