Pimpri News : कोरोना लसीकरणासाठी सरसकट सर्व औषध व्यवसायिकांची प्राधान्याने नोंदणी करावी – विवेक तापकीर

एमपीसी न्यूज – कोरोना लसीकरणासाठी सरसकट सर्व औषध व्यवसायिकांची प्राधान्याने नोंदणी करावी, अशी मागणी काळेवाडी -रहाटणी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विवेक तापकिर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांच्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एक पत्रक काढून कोरोना लसीकरणासाठी सर्व खासगी वैद्यकिय व्यवसायिक व त्यांच्या कर्मचा-यांची नोंदणी सारथी ॲप्लिकेशनवर करण्यास सांगितले आहे.

मात्र, यासोबतच सरसकट सर्व खासगी औषध व्यवसायिकांची देखील प्राधान्याने नोंदणी करावी तसेच, या कर्मचा-यांना मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी विवेक तापकिर यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.