Pimpri News: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाची हजेरी, गारांची बरसात 

एमपीसी न्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा मारा देखील झाला. साडेचारच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्येच गारा पडू लागल्या, पाऊस वाढला तसा गारांचा वर्षाव देखील वाढला. सध्या काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सकाळपासूनच उकाडा जाणवत होता, दुपारी अचानक ढग जमू लागले. साडेसहाच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्येच गारा पडू लागल्या, पाऊस वाढला तसा गारांचा वर्षाव देखील वाढला.

लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरात बसूनच पावसाचा आनंद लुटला. लहान मुले गारा गोळा करताना ठिक ठिकाणी पहायला मिळाली. गारांच्या पावसाचे सर्वांनाच कौतुक वाटले.

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा आणि केरळसह देशाच्या अनेक भागांत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, 28 आणि 29 एप्रिलला केरळ आणि माहेमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.